जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा तथा सुरेश दामू भोळे यांना चौथ्या फेरी अखेर ३५ हजार ९९९ मते मिळून जोरदार आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या नंबरवर महाविकास आघाडीच्या जयश्री सुनील महाजन यांनी १२ हजार ८४८ मध्ये घेतली आहेत. त्यामुळे सध्या २३ हजार मतांच्या आघाडीवर आ. भोळे हे पुढे आहेत.
इतर उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार अश्विन सोनवणे २४७०, वंचित बहुजन आघाडीचे ललितकुमार घोगले ८२१, यावल येथील जयश्री सुनील महाजन यांना ५२०, कुलभूषण पाटील ४४७, मनसेचे डॉ. अनुज पाटील यांना ३२९, बहुजन समाज पार्टीचे शैलजा सुरवाडे यांना २१९ मते मिळाले आहेत.