देवकर २३ हजार मतांनी पिछाडीवर
जळगाव (प्रतिनिधी) : येथील जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात नवव्या फेरीअखेर गुलाबराव पाटील यांनी सुमारे २३ हजार मतांनी आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे गुलाबराव देवकर हे पिछाडीवर आहे.
गुलाबराव पाटील यांना ४९ हजार ९६१ आणि गुलाबराव देवकर यांना २६ हजार ४१५ मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष प्रवीण सपकाळे यांना ५५१ तर मनसेचे मुकुंदा रोटे यांना ५५१ मते मिळाली आहे. आतापर्यंत ९ फेऱ्या संपल्या असून अजून १७ फेरी बाकी आहे.