जळगाव (प्रतिनिधी ) ;-गिरणा नदी पात्रात पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
शुभम उर्फ भवरलाल हिरालाल राजपूत (पाटील) वय २६ रा. खोटेनगर हिरा शिवा कॉलनी, जळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे. परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे. तरुणाच्या पश्चात तीन भाऊ ,आई वडील,आणि गर्भवती प्रतीक्षा पत्नी असून ती सध्या एरंडोल येथे माहेरी गेली आहे. याबाबत उशिरापर्यंत तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा शनिवारी मित्रांसोबत निमखेडी शिवारातील गिरणा नदीत गेलेला होता. तेथे काही लोक पाण्यात पोहत होते, शुभम याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात जायला घाबरत होता. पाण्यात उतरल्यावर खोल खड्डयाचा अंदाज न आल्याने त्यातच तो बुडाला. शेजारी पोहणारे तरुण व सोबतच्या मित्रांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून तातडीने शासकीय रुग्णालयात आणले. रस्त्यात त्याचा श्वास सुरु होता. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शुभमच्या मित्रांनी रुग्णालय गाठले. यावेळी रुग्णालयात कुटुंबातील महिलांही प्रचंड आक्रोश केेला. शुभमच्या पश्चात पत्नी प्रतिक्षा, आई उषा, वडील हिरालाल संतोष राजपूत व भाऊ असा परिवार आहे. शुभमचे वडील भाजीपाला व्यवसाय करतात. तर त्याचा भाऊ हातमजुरी करतो. तर शुभमही हातमजुरी करुन कुटुंबियांचा उदरनिर्वाहास हातभार लावत होता.