वरखेडे बॅरेजमधिल घटना ; परिसरात हळहळ
चाळीसगाव (प्रतिनिधी ) ; तालुक्यातील वरखेडे बॅरेजमध्ये काका-पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. हिरतसिंग जगतसिंग पवार (वय ४०) व मृनाल इंद्रसिंग पवार (१३) असे मृत काका पुतण्याचे नाव आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि गिरणा नदीवर असलेल्या वरखेडे बॅरेजमध्ये काका पुतणे आंघोळीसाठी गेले होते. यावेळी पुतण्या मृनाल पवार याने खोल पाण्यात उडी मारली असता तो पाण्यात बुडायला लागला. हे पाहून काका हिरतसिंग पवार यांनी पुतण्याचा जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली, मात्र जास्त पोहतायेत नसल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, हिरतसिंग पवार हे एसटी महामंडळमध्ये कार्यरत होते.