मृत जळगावातील आदर्श नगर येथील रहिवासी
जळगाव (प्रतिनिधी) : येथील कुलर्सच्या विक्रेत्याचा नवी दिल्ली येथे रेल्वेतून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना दिनांक १७ जुलै रोजी घडली. आधार कार्डवरील पत्त्यावरून कुटुंबियांना माहिती पोहचली. या प्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
विजयकुमार सुराणा-जैन (वय ५८, रा. आदर्श नगर, जळगाव) असे मृताचे नाव आहे. आठवडे बाजारात त्यांचे कुलर्स विक्रीचे दुकान आहे. व्यापाराच्या हिशोबासाठी सुराणा हे नेहमी दिल्लीला जात असत. मित्रासोबत ते नवी दिल्ली येथे गेले होते. रेल्वेत चढताना त्यांचा पाय घसरला. त्यात त्यांचा १७ रोजी रात्री ९.१५ वाजता मृत्यू झाला. या घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कळल्यानंतर सुराणा यांचे नातलग दिल्लीला रवाना झाले होते.
एअर अॅम्बुलन्सने त्यांचा मृतदेह औरंगाबाद येथे व तेथून जळगावला आणण्यात आला. खिशातील आधारकार्डवर रूस्तमजी शाळेजवळ असा पत्ता होता. त्यावरून माहिती नातेवाईकांना मिळाली.