मुंबई (वृत्तसंस्था) – राजपुतांना सरसकट आरक्षण द्यावं अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर 19 ऑक्टोबरला मोर्चा काढू, असा इशारा राजपूत महामोर्चाचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी दिलाय.
मराठा आणि राजपूत यांनी देशासाठी प्राणांचे बलिदान दिल्याची नोंद इतिहासात आहे. या देशाला गुलामीतून सोडवंले. त्यामुळे मराठ्यांसोबत राजपुतांनाही आरक्षण देण्यात यावं, असं अजयसिंह सेंगर यांनी म्हटलंय.
दरम्यान, प्रत्येक जाती, प्रत्येक धर्मास वेगळे-वेगळे कायदे असणारे विषमता प्रधान करणारे सविंधानच बदला, असंही अजयसिंह सेंगर म्हणाले आहेत.