दारूविक्री करणाऱ्या महिलेस जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्थानबद्ध
‘एमपीडीए’ अंतर्गत राज्यातील पहिलीच कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील हरीविठ्ठल नगरात राहणाऱ्या एका महिलेला एमपीडीए कारवाई अंतर्गत स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे. दरम्यान महाराष्ट्रातून पहिल्यांदाच महिलेला एमपीडीए अंतर्गत स्थानापद्धती केल्याची घटना आहे. धन्नूबाई यशवंत नेतलेकर (वय-५०) रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव असे स्थानबद्ध केलेल्या महिलेचे नाव आहे.
हरीविठ्ठल नगर परिसरात धन्नूबाई यशवंत नेतलेकर या महिला बेकादेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करून हरीविठ्ठल नगर परिसरात विक्री करत आहे. त्यामुळे या परिसरातील तरुण पिढी ही व्यसनाधीन होत असल्याचे समोर आले आहे. तिच्यावरती अद्यापपर्यंत रामानंद नगर पोलिसांनी अनेक कारवाया केल्या. तरी पण तिच्यामध्ये कुठलीही सुधारणा होत नसल्याचे दिसून आले. या अनुषंगाने रामानंदनगर धन्नूबाई नेतलेकरच्या विरोधात एमपीडिए कारवाई अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असा अहवाल रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठविला.
दरम्यान ही महिला गेल्या आठ ते दहा वर्षांपासून रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टीची मदत घेऊन दारूची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी संशयित महिला गुन्हेगार धन्नूबाई यशवंत नेतलेकर (वय – ५०) या महिलेला अकोला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. दरम्यान महिलेवर स्थानबद्धतेची ही कारवाई पहिल्यांदाच असून ही घटना महाराष्ट्र राज्यातून पहिलीच असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे, सुशील चौधरी, सुनील दामोदरे, राजेश चव्हाण, विजय खैरे, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, रवींद्र चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे ईश्वर पाटील, इरफान मलिक, महिला पोलीस राजश्री पवार यांचे सह आदींनी कारवाई केली आहे.