राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता
जळगाव (प्रतिनिधी) : हातभट्टीची दारु तयार करणाऱ्या किरण श्रावण कोळी (वय २८, रा. भोलाणे, ता. जळगाव) याला एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात त्याला स्थानबद्ध करण्यात आले आहे.
जळगाव तालुक्यातील भोलाणे येथील किरण कोळी याच्याविरुद्ध अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्यासह दारू तयार करण्याचे गंभीर गुन्हे होते. त्याला कायद्याचा धाक राहिलेला नव्हता. कारवाईनंतर देखील कारागृहात तसेच त्याच्याविरुद्ध वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्याच्या वर्तनात येथील सुधारणा होत नव्हती. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारु विक्री कारवाईचा प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी किरण कोळी याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क – विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक डी एम. चकोर, दुय्यम निरीक्षक भगत, एस. एम. मोरे, कॉन्स्टेबल दिनेश पाटील, रघुनाथ सोनवणे, गोकुळ आहिरे, व्ही. डी. हाटकर, विपुल राजपूत यांच्या पथकाने केली.