हातभट्टीवाल्यांसह एकाचा समावेश, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील धोकादायक व्यक्तीसह हातभट्टीवाल्यांवर दाखल प्रस्तावाअंतर्गत जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबद्धतेची मोठी कारवाई केली आहे. त्यानुसार यातील दोघांना ठाणे कारागृह इतर दोघांना मुंबई कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
रावेर पोलीस स्टेशनअंतर्गत गुन्हेगार शेख तौसिफ़ शेख अफजल (वय २८ रा. फतेह नगर, रावेर) , अयुब बशीर तडवी (वय ५५ रा. कुसुंबा ता. रावेर), मगन मुरलीधर करवले (वय ४३ रा. अटवाडे ता. रावेर) यांच्यासह पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील मनोहर उर्फ मोहन उखर्डू कोळी (वय ५५ रा. लोहारी बुद्रुक ता. पाचोरा) असे चौघ स्थानबद्ध गुन्हेगारांची नावे आहेत.(केसीएन) यातील शेख तौसीफ वगळता इतर तिघांवर हातभट्टीवाला या संज्ञेत प्रस्ताव दाखल करण्यात आलेले होते.
शेख तौसीफ याच्यावर धोकादायक व्यक्ती म्हणून निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी प्रस्ताव एलसीबीकडे पाठवलेला होता तर अयुब तडवी व मगन करवले यांच्यावर हातभट्टीवाला संज्ञेत एलसीबीकडे प्रस्ताव दिलेले होते. पिंपळगाव हरेश्वर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी मनोहर कोळी याचा प्रस्ताव एलसीबीकडे दिलेला होता.(केसीएन)त्यानंतर सदर प्रस्तावांचे अवलोकन केल्यावर हे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी दि. १८ जुलै रोजी रात्री उशिरा चौघांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्याबाबत आदेश पारित केले आहेत.
यातील तौसीफ शेख आणि मनोहर कोळी यांना ठाणे जिल्हा कारागृहात तर आयुब तडवी आणि मगन करवले यांना मुंबई कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहेत. सदरचे प्रस्ताव निरीक्षक डॉ. जयस्वाल आणि पिंपळगाव हरेश्वरचे सपोनी प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले होते. प्रस्तावाचे अवलोकन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक फौजदार युनूस शेख, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, रफिक शेख, ईश्वर पाटील यांनी केले आहे.