जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली रस्त्यावरील गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाने सवलतीच्या दरात होणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेत दोन महिन्यात 275 शस्त्रक्रियांचा टप्पा गाठला आहे. रुग्णांना अंधूकतेकडून उजेडाकडे नेण्याचे काम अत्यल्प दरात रुग्णालयाने केल्याने रुग्णांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
मोतीबिंदूमुक्त अभियानात देवकर रुग्णालयात दर गुरुवारी पंचवीस जणांवर अत्यल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यात सलग अकराव्या गुरुवारी ( 3 मार्च) रुग्णालयाने 25 शस्त्रक्रिया करून 275 शस्त्रक्रियांचा टप्पा पार केला आहे. येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त 2500 रुपये, तर फेको शस्त्रक्रिया अवघ्या 6000 रुपयांत होत असल्याने रुग्णांची बचतही होत आहे.
जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या संकल्पनेनुसार गरजू रुग्णांना आर्थिक दिलासा देण्यासाठी अत्यल्प दरात या शस्त्रक्रिया होत आहेत . रुग्णाच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी सर्व तपासणी, दवाखान्यातील निवास व भोजनाचा खर्च याच पैशांत होत असल्याने रुग्णांमध्ये समाधान आहे.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर येथील सोयी , उपकरणे, डॉक्टर, परिचारिकांची सेवा यांच्याबाबत अप्पासाहेब देवकर स्वतः रुग्णांशी संवाद साधून विचारपूस करीत आहेत. सर्व रुग्णांनी येथील सेवेबाबत समाधान व्यक्त करत श्री देवकर यांचे आभार मानले आहेत. रुग्णांनी 9370935252 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.