जळगाव ( प्रतिनिधी ) – तांबापुरा परिसरातील बिसमिल्ला चौकात रिक्षाचालकाची त्याच्या घराच्या कुंपणातून पाण्याची मोटार चोरुन नेली आहे, याप्रकरणी रविवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात बिसमिल्ला चौकात बबलू शेख उस्मान (वय ३२) हे रिक्षाचालक राहतात. ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास बबलू शेख यांच्या घरातील कुंपणातून त्यांची ७ हजार रुपये किंमतीची पाण्याची मोटार आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही पाण्याची मोटार मिळून न आल्याने चोरीची खात्री झाल्यावर सहा दिवसानंतर बबलू शेख यांनी रविवार, ९ ऑक्टोंबर रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील हे करीत आहेत.