मोताळा ( प्रतिनिधी ) – येथील शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राणिशाश्त्र विभागातर्फे जागतिक एड्स दिनानिमित्त विद्यार्थ्यांना एड्सबद्दल माहिती देण्यासाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
जागतिक एड्स दिन प्रथम 1 डिसेंबर 1988 रोजी साजरा करण्यात आला. एचआयव्ही किंवा एड्सग्रस्त लोकांना मदत करणे आणि गैरसमज दूर करून लोकांना शिक्षित करणे हा उद्देश आहे.एड्सग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी निधी गोळा करणे, एड्स टाळण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता , एड्सग्रस्त लोकांशी भेदभाव थांबवणे हा हेतू आहे.जागतिक एड्स दिन 2021 ची थीम ‘असमानता संपवा. एड्स संपवा’ अशी आहे .
प्राचार्य डॉ.सुनील मामलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणिशाश्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ .अभय ठाकूर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले .अध्यक्ष्या म्हणून महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख प्रा.सौ .नंदा मास्कर , प्रमुख पाहुणे म्हणून वनस्पतिशाश्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ .प्रवीण ठेंग उपस्थित होते .विद्यार्थ्यांना एड्सविषयीची माहिती प्राणिशाश्त्र प्रा डॉ .चित्रा मोरे यांनी दिली .प्रास्ताविक प्रा.डॉ.अभय ठाकूर तसेच आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अरुण गवारे यांनी केले . प्रा.डॉ.राहुल उके ,प्रा.शुभम साखरे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्स्थित होते.