अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील घटना
अमळनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पातोंडा येथील सरपंच मनीषा मोरे यांच्या पतींना एकाने मजुरांना बोलवायचे आहे त्यासाठी फोन लावून द्या असे सांगून फोनवर बोलण्याचे कारण करीत मोबाईल लांबवल्याची घटना पातोंडा येथील घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
येथील न्यू प्लॉट भागांतील रहिवासी सरपंच मनिषा मोरे यांच्या घरी बुधवार रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सरपंच यांचे पती विजय मोरे हे दुपारी घराबाहेर उभे असताना एक अज्ञात व्यक्ती त्यांच्याजवळ येऊन मला सेंट्रीग नेण्यासाठी गाडी लागणार असून तुमची गाडी भाड्याने मिळेल का? अशी विचारणा केली. त्यानंतर विजय मोरे व तो व्यक्ती गाडी घेवून निघाले. पुढे एका अरुंद गल्लीजवळ गाडी थांबवून त्या अज्ञात व्यक्तीने मला माझ्या मजुरांना फोन करून बोलवायचे सांगून मोरे यांच्याकडून मोबाईल मागितला आणि खाली उतरला.
मोरे हे गाडी रिव्हर्स करत असताना तो अज्ञात व्यक्ती मोबाईल घेऊन पसार झाला. सदर व्यक्ती मोबाईल घेऊन येत कसा नाही हे बघायला मोरे हे गेले तेव्हा त्यांना सदर व्यक्ती दिसून आला नाही. शेवटी त्यांना सदर व्यक्ती मोबाईल चोरून नेल्याचे लक्षात आले. सदर अज्ञात चोरटा सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला असून मोरे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला त्या व्यक्ती विरुद्ध तक्रार दिली आहे. सदर अज्ञात चोरटयाने १५ दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने एका गाडी मालकाचा मोबईल लाबविला असल्याचे सांगण्यात येत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.