जळगाव ( प्रतिनिधी ) – काही लोक सापडलेल्या खोक्यातील वस्तू वाटप करून घेत असल्याची टीप खबऱ्यांनी पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी खोका जप्त करून मालकांना शोधले आणि खात्री करून घेत त्यातील वस्तू मालकांना सोपवल्या .

सुप्रीम कॉलोनीतील नितीन साहित्या नगरातील रिक्षाचालक मनोज सोनवणे यांना हा खोका सापडला होता . पोलिसांनी तो खोका पंचनामा करीत जप्त करून त्यातील वस्तू आणि माहितीच्या आधारे मालकांना शोधले या खोक्यात १ लाख ३२ हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे ९ मोबाईल होते ते सुरेशकुमार कुकरेजा ( सिंधी कॉलोनी ) यांच्या मालकीचे असल्याचे निसपन्न झाल्यावर त्यांना परत देण्यात आले . १ लाख ६५ हजार रुपये किमतीची इमिटेशन ज्वेलरी विजय बजाज ( टी एम नगर ) यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांना परत देण्यात आली . या व्यापाऱ्यांनी हा माल जालना येथे पाठवण्यासाठी एस टी च्या पार्सल सेवेकडे सोपवला होता.







