जळगाव ( प्रतिनिधी ) – घाणेकर चौकातून पायी जाणाऱ्या तरूणाच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन भामट्यांनी मोबाईल हिसकावून ते पसार झाले शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
गिरीश समाधान माळी (वय-२२ रा. कांचन नगर) सोमवारी रात्री मोबाईलवर बोलत पायी जात असतांना त्याच्या मागून अज्ञात दोन चोरटे दुचाकीवर आले. चोरट्यांनी तरूणाच्या हातातील मोबाईल हिसकावून दुचाकीवर पसार झाले. तरूणाने आरडाओरड केली तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.
गिरीश माळीने गुरूवारी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात दोन जणांविरोधात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि यशोदा कणसे करीत आहे.