जळगावातील शिवाजीनगरात केली होती चोरी
जळगाव (प्रतिनिधी) – शहर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यांमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका संस्थेत चोरट्यास मुद्देमालासह अटक केली आहे. त्याच्याकडून तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
राकेश कैलास जगताप (वय २०, रा. सम्राट कॉलनी, जळगाव) असे या संशयित चोरट्याचे नाव आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशनला मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने राकेश जगताप याला ताब्यात घेतले. त्याने शिवाजीनगर भागातील राजाराम नगर मधील बौद्ध विहाराजवळून चोरून नेलेले तीन मोबाईल काढून दिले आहे.
दरम्यान, सदर तपासासाठी संशयित राकेश जगताप याला शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याला ताब्यात घेण्याकामी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अकरम शेख, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, संदीप साबळे, विजय पाटील, किरण चौधरी, ईश्वर पाटील यांनी परिश्रम घेतले.