शनीपेठ पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) ;- शहरातील रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या दोघा भामट्यांना शनिपेठ पोलीस स्टेशन ने सापळा रचून अटक केली आहे त्यांच्याकडून दुचाकी गुन्ह्यातील मोबाईल जप्त करण्यात आले आहेत त्यांनी एका फिर्यादीच्या खात्यातून पंधराशे रुपये देखील काढून घेतले असल्याचे दिसून आले आहे
जाकीर शहा युनोस शहा वय 23 वर्ष राहणार फातिमानगर जळगाव आणि इमरान शहा फिरोजशहा वै बावीस वर्षे राहणार टिपू सुलतान चौक तंबापुरा असे अटक केलेल्या दोघेही भामट्यांची नावे आहेत दोघेही संशयित आरोपी हे त्यांच्या कब्जात पाच महागडे अँड्रॉइड मोबाईल हँडसेट घेऊन दुचाकी व संशय स्वस्त फिरत होते त्यावेळेला शनिपेठ पोलीस स्टेशन ने त्यांची चौकशी केली तेव्हा दुचाकीचा चेसिस नंबर खोडलेला दिसून आला त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता संशयित आरोपी जाकीर शहा आणि इमरान शहा यांनी सागर पार्क मैदानाजवळ आणि गिरणा टाकी पास जवळ आणि इतर आणखी ठिकाणी महिलांच्या हातातून मोबाईल हिसकावून पळ काढण्याची कबुली दिली आहे सायंकाळच्या वेळी सार्वजनिक रस्त्यावर फोनवर बोलत जाणाऱ्या महिलांचे मोबाईल हिसकावून चोरी करण्याची या दोन्हीही भामट्यांची कार्यप्रणाली असल्याचे पोलिसांनी सांगितले सदरहू संशयित आरोपी जाकीर शहा व इमरान शहा यांच्याकडून दुचाकी क्रमांक एम एच 19 सीबी 91 14 आणि पुण्यातील मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत याशिवाय सात जुलै रोजी रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या मोबाईल चोरीच्या दोन गुन्ह्यात देखील संशय त्यांचा सहभाग झाल्याचे निश्चित झाले आहे चोरून नेलेल्या एका मोबाईलचा पॅटर्न लॉक हा वेगवेगळे पॅटर्न ट्राय करून सदरचे लॉक उघडून फोन पे द्वारे भामट्यांनी पंधराशे रुपये फिर्यादीच्या खात्यातून काढून घेतले असल्याचे व तसे त्यांनी कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे