महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर
जळगाव (विशेष प्रतिनिधी) : येथील महानगरपालिकेच्या बहुचर्चित आरक्षणाची सोडत मंगळवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात आली यावेळी महापालिकेच्या सभागृहात नागरिकांसह राजकीय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

महानगरपालिकेच्या दुसऱ्या सभागृहात चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, नगररचनाकार अमोल पाटील, अभियंता योगेश वाणी, नगर सचिव मनोज शर्मा आदी उपस्थित होते. जशी जशी आरक्षण सोडत निघत होती तशी तशी राजकीय कार्यकर्त्यांसह इच्छुक उमेदवारांची धडधड वाढत होती. मात्र आरक्षण सोडत पूर्ण झाल्यानंतर पूर्ण चित्र स्पष्ट झाले. अखेर कोणत्याही प्रस्थापिताला धक्का बसला नसून फक्त आता तिकिटांसाठी रस्सीखेच वाढणार आहे.
१९ प्रभागातील १८ वगळता सर्वच ठिकाणी ‘ड’ हा सर्वसाधारण असल्यामुळे अनेक प्रस्थापितांचे फावणार आहे. प्रत्येक प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड असून सर्वच पक्षांमध्ये बंडखोरीला उत येणार आहे, असे चित्र आता दिसून येत आहे. भावी नगरसेवकांनी व प्रस्थापित माजी नगरसेवकांनी आता तयारी करून ठेवली असून पुढील दोन दिवसात सोशल मीडियावर भावी नगरसेवकांचे पेव फुटणार आहे.
मनपा आरक्षण
प्रभाग १
अ) एससी महिला
ब) ओबीसी
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग २
अ) एससी
ब) ओबीसी महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग ३
अ) एससी महिला
ब) एसटी महिला
क) ओबीसी
ड) सर्वसाधारण
प्रभाग ४
अ) एससी महिला
ब) ओबीसी
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग ५
अ) ओबीसी
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग ६
अ) ओबीसी महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग ७
अ) ओबीसी महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग ८
अ) ओबीसी
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग ९
अ) ओबीसी महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग १०
अ) एससी
ब) ओबीसी महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग ११
अ) एसटी महिला
ब) ओबीसी
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग १२
अ) एससी
ब) ओबीसी महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग १३
अ) ओबीसी
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग १४
अ) ओबीसी
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग १५
अ) ओबीसी महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग १६
अ) ओबीसी
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण
प्रभाग १७
अ) ओबीसी महिला
ब) सर्वसाधारण महिला
क) सर्वसाधारण
ड) सर्वसाधारण
प्रभाग १८
अ) एसटी
ब) ओबीसी महिला
क) सर्वसाधारण महिला
प्रभाग १९
अ) ओबीसी महिला
ब) ओबीसी
क) सर्वसाधारण महिला
ड) सर्वसाधारण









