जळगाव;मनपाच्या गणेश कॉलनी परिसरातील अशोक बेकरी समोर असणाऱ्या गोडावूनचे कुलूप तोडून ६ हजार रूपये किंमतीचे ईलेक्ट्रिक चोक अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.
गणेश कॉलनी लगत असणाऱ्या विजय कॉलनी परिसरात मनपाच्या गोडाऊनमध्ये अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या वस्तू याठिकाणीठेवल्या जातात.अज्ञात चोरट्यांनी बंद गोडावून फोडून गोडावून मध्ये ठेवलेले ६ हजार रूपये किंमतीचे इलेक्ट्रिक चोक असलेले तांब्याचे तार चोरून नेले. हा प्रकार रविवारी उघडकीस आला. महापालिकेचे कर्मचारी युवराज मेढे रा. दांडकर नगर यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.