अमळनेर (प्रतिनिधी) – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अमळनेर शहर कार्यकारिणी काल जाहीर करण्यात आली. यावेळी प्रदेशसहमंत्री सिद्धेश्वरजी लटपटे, जिल्हा संयोजक रितेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीची सुरुवात सर्वांच्या परिचयाने करण्यात आली. त्यानंतर मागील शैक्षणिक वर्षातील अभाविप अमळनेर शहरवतीने केलेल्या कार्याचा उजाळा शहरमंत्री निलेश पवार यांनी दिला व त्यानंतर रितेश चौधरी यांनी मागील शैक्षणिक वर्षाची कार्यकारिणी विसर्जित केली आणि रितेश चौधरी यांनी नवीन शैक्षणिक वर्ष २०२०- २०२१ कार्यकारिणी जाहीर केली त्यात शहरमंत्री केशव पाटील, सह मंत्री वैभव पाटील, विद्यार्थिनी प्रमुख वैष्णवी पाटील, सहप्रमुख गायत्री पाटील, महाविद्यालय प्रमुख योगिता तायडे, सह प्रमुख प्रथमेश निकुंभ, स्टुडंट्स फॉर सेवा (SFS) कार्यप्रमुख अश्विन चौधरी, Agri vision प्रमुख नितीन राठोड, SFD प्रमुख अक्षय राठोड, आंदोलन प्रमुख दामिनी पाटील, कार्यकारिणी सदस्य राकेश बोरसे, निलेश पवार, प्रगती काळे, रोहन शिंपी, अमोल पाटील,रोहित पवार, नरेंद्र देसले, गायत्री पाटील आदींची निवड जाहीर करण्यात आली. यानंतर प्रदेशसह मंत्री सिद्धेश्वरजी लटपटे यांनी सर्व कार्यकारिणी सदस्याचें अभिनंदन केले व आगामी काळात शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेल व प्रत्येक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन उपस्थित कार्यकर्त्यांना दिले.







