कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे कुलगुरू पी .पी. पाटील यांचे प्रतिपादन
जळगाव ( प्रतिनिधी) – वृक्षसंवर्धनाशिवाय वृक्षारोपण कार्याची परिपूर्ती होत नाही असे
मार्मिक प्रतिपादन बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे कुलगुरू मा . पी.पी. पाटील यांनी काढले . जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांचे स्व . पिताश्री किसन नाले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे जिल्हा सहसचिव विजय लुल्हे आयोजित १०१ वृक्षारोपण कार्यक्रमाच्या शुभारंभा प्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलगुरू पाटील बोलत होते . दिनांक २६ सप्टेंबर २०२० रोजी निवृत्ती नगर येथील कार्तिक स्वामी मंदिराच्या प्रांगणात कुलगुरू पाटील यांच्या हस्ते नीम , चिंच , सीताफळ या वृक्षांचे रोपण करून अभियानास प्रारंभ झाला .त्याप्रसंगी नगरसेविका निता सोनवणे ,नगरसेविका प्रतिभा देशमुख ,नगरसेवक विजय पाटील , विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील, सहाय्यक फौजदार विश्वासराव पाटील मान्यवर उपस्थित होते .
प्रारंभी कै . किसन नाले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण कुलगुरू यांनी केले . त्यानंतर स्वर्गीय नाले यांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .पर्यावरण मंडळाचे जिल्हा सहसचिव विजय लुल्हे यांनी वृक्षारोपणाची जन चळवळ होण्यासाठी कृती कार्यक्रम, नियोजन व कार्यवाही याबाबत मार्गदर्शन करून मंडळाचे ध्येयधोरणे व उद्दिष्ट्ये सांगितली . नगरसेविका नीता सोनवणे यांनी स्व . नाले यांचे सामाजिक कार्य सांगितले . सामाजिक कार्यकर्ते गजानन देशमुख यांनी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांनी कोविळ महामारी काळात कलेक्टर ऑफिस सह सर्व शासकीय कार्यालयांना मोफत सॅनिटरेरायजेशन व दररोज ४०० स्थलांतरित मजूर व दीनदलितांना प्रतिष्ठानतर्फेअन्नदान करून वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा निष्ठेने चालवित असल्याबद्दल गौरवोद्गार काढले .
मंदिर परिसरात नगरसेविका नीता सोनवणे, नगरसेविका प्रतिभा देशमुख, नगरसेवक विजय पाटील, पर्यावरण मंडळाचे सहसचिव विजय लुल्हे, सहायक फौजदार विश्वासराव पाटील , विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री दिपक दाभाडे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने विजय लुल्हे प्रकाशित गांधीजींचे सात सामाजिक पातके व एकादश व्रते पोस्टर्स कुलगुरू पी .पी. पाटील तसेच मान्यवरांना लुल्हे यांनी सन्मानपूर्वक भेट दिली . कुलगुरू यांच्या हस्ते एस . के .पवार यांना वृक्ष दान करण्यात आले .
कार्यक्रमास दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा . वासुदेव पाटील, सर्पतज्ञ विवेक देसाई, राहुल लोखंडे, प्रशांत सुर्वे आणि परिसरातील वृक्षप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनमत प्रतिष्ठानचे सदस्य हर्षाली पाटील , वेदांत नाले ,चित्रा मालपाणी, सौ .भारती नाले यांनी अमूल्य सहकार्य केले . सुत्रसंचालन विजय लुल्हे यांनी केले .