रतनलाल सी बाफना यांचे दुपारी सोमवारी 16 नोव्हेंबर रोजी ऐन पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या दिवशी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. बाफनाजी हे भाईसाहेब म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक वंचित लोकांना, दिव्यांग तसेच गरिबांना आर्थिक मदत तसेच वस्तूंची मदत केलेली आहे. त्यांच्या अहिंसा तीर्थ गोशाळा येथे सुमारे ३ हजार देशीसह इतर जातीच्या गाई आहेत.

जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत आभूषणांची या व्यवसायाद्वारे बाफना परिवाराच्या तिसऱ्या पिढीने दमदारपणे पाऊल ठेवलेले आहे. विश्वास आणि परंपरेचा पिढीजात वारसा जपून रतनलाल सी बाफना ज्वेलर्स जळगाव जिल्हापुरता मर्यादित न राहता औरंगाबाद, नाशिक, नांदेड यासह सहा शोरूम मध्ये विस्तारलेला आहे. अर्थात हे सर्व ग्राहकांच्या पिढीजात विश्वास, सोन्याच्या शुद्धतेची परंपरा आणि काळानुरूप दागिन्यांची निर्मिती तसेच फॅशनमधील बदल यामुळे शक्य केले आहे. यासह आर सी बाफना ज्वेलर्स ग्राहकांचे हित, संतोष आणि सेवा याला साहेबांच्या नेतृत्वाखाली महत्व दिले आहे.
याबरोबरच ग्राहकांचे सुवर्ण आभूषण यांची फ्री इन्शुरन्स योजनेअंतर्गत सुरक्षा करण्याची हमी घेऊन नव्या पिढीने व्यवसायातील नवी परंपरा बाफनाजी यांच्यानंतर निर्माण केली आहे. बाफनाजी यांच्या 47 वर्षांच्या व्यापारातील सेवेसह त्यांची कर्मभूमी असलेल्या जळगाव सुवर्णनगरीतील 67 वर्षाच्या आनंदमय प्रवासातील एक साक्षीदार असल्याचं रतनलाल सी बाफना यांना खूप समाधान आहे. भारतीय परंपरा आणि संस्कृतीमध्ये सोन्याला खूप महत्त्व आहे. सणावाराला सोन्याची खरेदी शुभ मानले जाते. सोने व्यापाराला एका चांगल्या उंचीवर बाफनाजी यांनी नेऊन ठेवले आहे.
जळगावच्या जवळपास दीडशे वर्षांपेक्षा मोठा इतिहास आणि तीन हजार कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल असलेला जळगाव सराफ बाजार देशभर प्रसिद्ध आहे. जळगाव सोन्याची बाजारपेठ म्हणून आपली ओळख आजही आहे. याच बाजारपेठेत सन्मानाचे नाव म्हणून रतनलाल सी बाफना ज्वेलर्स आहे. रतनलाल बाफना हे सुवर्णनगरीचे महत्वाचे शिल्पकार मानले जातात. त्यांनी जिल्हा सराफ असोसिएशनचे सत्तावीस वर्ष निरंतर अध्यक्षपद सांभाळले आहे. त्यांच्या फर्मद्वारे अनेक हातांना त्यांनी रोजगार दिला आहे. बाफनाजी यांची कुसुंबा येथे गोशाळा आहे. या अहिंसा तीर्थ गोशाळामध्ये देशी गाई मोठ्या प्रमाणात असून त्यांचे संगोपन चांगल्या प्रकारे होते. देशी गाईंच्या पासून होणाऱ्या निर्मिती उत्पादनांमुळे जळगावची एक ओळख सुद्धा राज्यभर,देशभर आहे. गो सेवेमुळे बाफनाजी चांगले प्रसिद्ध आहेत.
गोसेवाप्रेमी रतनलाल सी बाफना यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. दातृत्व असलेले व्यक्तिमत्त्व जाण्यामुळे सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
अंतिम संस्कार
आज सायंकाळी 5 वाजता अहिंसा तीर्थ,रतनलाल सी.बाफना गो सेवा अनुसंधान केंद्र कुसुबा येथे परिवाराच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार होणार आहे.







