यावल ;- प्रांत डॉक्टर अजित थोरबोले, डी.वाय.एस.पी. नरेंद्र पिंगळे तहसीलदार जितेंद्र कुवर, पी.एस.आय. जितेंद्र खैरनार फैजपुर पोलीस ए.पी.आय. प्रकाश वानखेडे यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे दिनांक 13 मे 2020 बुधवार पर्यंत यावल तालुक्यात कोरोना बाधित एक सुद्धा रूग्ण आढळून आलेला नव्हता. परंतु दिनांक 5 मे रोजी बाहेर गावाहून म्हणजे अहमदाबाद येथून फैजपुर शहरातील सिंधी वाड्यात आलेल्या दोन महिलांचा अहवाल दिनांक 15 मे गुरुवार 2020 रोजी पॉझिटिव्ह आढळून आल्याने फैजपुर शहरासह संपूर्ण यावल तालुक्याची झोप उडाली असली तरी वरील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी तालुक्यात सतर्कतेचे आदेश काढले आहेत.
यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बबंन तडवी हे यावल मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नसल्याने ते जळगाव जिल्ह्यातून पाचोरा येथून दररोज 100 किलोमीटर अंतरावरून येत जात असल्याने त्यांच्याविषयी सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, याकडे प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यावल तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी आपले लक्ष केंद्रित करून अशा संवेदनशील परिस्थितीत यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा घेऊन तसेच बाहेरगावाहून अप डाउन करीत असल्याचा अहवाल तयार करून जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पाठवून पुढील कार्यवाही करावी असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.
दिनांक 5 मे 2020 रोजी फ़ैजपूर शहरातील सिंधी वाड्यात दोन महिला अहमदाबाद येथून आल्या आणि त्या 10 दिवसानंतर पॉझिटिव आढळून आल्याने याबाबत त्या महिलांना विलगीकरण कक्षात ठेवले होते किंवा नाही ? त्या महिला आल्याची माहिती महसूल व पोलिस विभागाला न देता लपविण्यात आली होती का ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असल्याने त्या दोन महिलांसह त्यांच्या नातेवाईकांची सखोल चौकशी करून पुढील कडक कार्यवाही करावी अशी मागणी संपूर्ण यावल तालुक्यातून होत आहे. गेल्या दहा दिवसात यावल तालुक्यात बाहेरगावाहून तसेच राज्यातून अनेक जणांचे आगमन झाले आहे यावल शहरात मुख्य रस्त्यावर तसेच गल्लीबोळात गर्दीचे प्रमाण वाढत असल्याने तसेच ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळले जात नाही अनेक जण तोंडावर आणि नाकावर मास्क लावीत नाहीत गावात विविध भागात फिरणारे काही किरकोळ व्यवसायिक विक्रेते तोंडा नाकावर माक्स लावीत नसल्याने आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने यावल शहरासह तालुक्यात कोरोना विषाणू बाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
प्रांत डॉक्टर अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर, डी.वाय.एस.पी. नरेंद्र पिंगळे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पी.एस.आय. जितेंद्र खैरनार, फैजपुर पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. प्रकाश वानखेडे यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासन सतत प्रयत्नशील आहेत. परंतु यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी हे दररोज शंभर किलोमीटर अंतरावरील पाचोरा येथून अपडाऊन करीत असल्याने तसेच मुख्यालयाच्या ठिकाणी राहात नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर तसेच कर्तव्यावर विपरीत परिणाम झाला असून नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर त्यांचे नियंत्रण राहिलेले नाही आणि आणि काही ठराविक कर्मचाऱ्यांचे हितसंबंध लक्षात घेता काही कर्मचारी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत प्लास्टिक पिशव्या विरोधातील दंडात्मक कार्यवाही आणि लॉक डाऊन कार्यकाळात केलेली नाममात्र दंडात्मक कार्यवाही लक्षात घेता यावल नगरपरिषद 50 टक्के प्रमाणात निष्क्रिय ठरली असल्याचे यावल प्रशासनात व शहरात बोलले जात आहे.
आरोग्य विभागात जबाबदार वैद्यकीय अधिकारी आपल्या कामात व्यस्त असताना यावल येथील एक आणि किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक कर्मचारी आपल्या सोयीनुसार वरिष्ठांची कोणतीही परवानगी न घेता आरोग्य केंद्रातील गोपनीय माहिती बाहेर प्रसिद्ध करून स्वतःची चमकोगिरी करून घेत असल्याने याकडे डॉक्टर हेमंत बराटे आणि डॉक्टर बारेला यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.