जळगाव (प्रतिनिधी) – येथील प्रभाग क्रमांक 13 येथे असलेले रस्ते प्रचंड खराब झाले असून वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
महाबळ कॉलनी पासून संत गाडगेबाबा चौकाकडे जात असताना जो मुख्य रस्ता लागतो या रस्त्यावर अनेक वाहनधारकांची ये-जा सुरू असते. मात्र हे रस्ते खूप खराब झाले असून ते त्वरित दुरुस्त व्हावेत याकरिता प्रभाग 12 चे नगरसेवक नितीन बरडे यांनी स्थायी समिती व महासभेच्या सभेमध्ये देखील याकडे लक्ष वेधले होते. मात्र प्रशासनाकडून गोलमाल उत्तरे देत लवकरच काम करू असे सांगण्यात आले होते. वाहनधारकांचा होणारा त्रास आणि वाहनांचे होणारे नुकसान यामुळे नागरिक संतप्त झाले असून शहरातील रस्त्यांना लवकरच डागडुजी व डांबरीकरण केले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे