चंद्रपूर – राज्यात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. अगदी सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांना सुद्धा कोरोना होण्याचे सत्र सुरूच आहे. नुकतचं राज्याचे माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार केले जाणार आहे. तसेच मुनगंटीवार यांच्या घरातील अन्य सदस्यांची सुद्धा कोरोना चाचणी केली जाणार आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचा कहर कायम असून, त्यापार्श्वभुमीवर यंदाचे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन दोनच दिवसात आटोपण्यात आले. मात्र अधिवेशनानंतर अनेक आमदार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.