पाचोरा ( प्रतिनिधी) – कोविड सेंटरमध्ये आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला असून ही आत्महत्या नसून माझ्या पतीचा घातपात झाला असल्याचा आरोप मयताच्या पत्नीने पाचोरा शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत करून न्याय न मिळाल्यास आपल्या दोन्ही चिमुकल्यांसह आत्मदहनाचा इशारा दिला.
पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथील रहिवासी विनोद रमेश कोकणे (वय ३४) यांना दि. १९ जुलै रोजी ताप व खोकला येत असल्याने ते स्वत:हुन वरखेडी रोडवरील क्वाॅरटाइन सेंटरमध्ये दाखल झाले होते. त्यांना संबंधित आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खबरदारी म्हणुन क्वाॅरटाइन करुन घेतले होते. त्या अनुषंगाने दि.२० रोजी विनोद कोकाने यांचा स्वॅब घेण्यात आला होता. दुर्दैवाने त्यांचा रिपोर्ट येण्याच्या अगोदरच क्वाॅरटाइन सेंटरमधील चॅलन गेटला विनोदचा मृतदेह संशयास्पद गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळुन आला होता. त्यांची पत्नी भारती विनोद कोकाने यांनी विनोद यांच्या मृत्युबाबत संशय व्यक्त करत ही आत्महत्या नसुन घातपात असल्याचा आरोप केला. याप्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास गुरुवार दि. १७ रोजी आपल्या मुलांसह शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आत्मदहनाचा इशारा दिला आहे.







