मुक्ताईनगर [प्रतिनिधी] आरोग्य विभाग व नगरपरिषद नगरपंचायत,पोलीस प्रशासन, अंगणवाडी सेविका कोरोंनाच्या काळात प्राणाची बाजी लावून सर्वसामान्य नागरिकांना कोरोना पासून बचावण्यासाठी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नाची व त्यांच्या कार्याची दखल घेऊन वंदे मातरम ग्रुप ने अधिकाऱ्याचा व त्या कर्मचाऱ्यांचा मानपत्र, फुलगुच्छ देऊन सत्कार केला.

मुक्ताईनगर येथील पंचायत समितीच्या सभागृहात अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांचा कोरोना योद्धा गौरव पुरस्कार देऊन देऊन अधिकारी व कर्मचारी यांच्या चेहऱ्यावर पुन्हा चैतन्य निर्माण करून मनोबल वाढवण्याचा प्रयत्न वंदे मातरम ग्रुप ने केलेला आहे .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती सभापती विद्या पाटील तर प्रमुख पाहुणे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड पोलीस उपनिरीक्षक निलेश साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश पाटील, व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष बंटी जैन, नम्रता माळी, सपना
सापधरे होते. वंदे मातरम ग्रुप चे अध्यक्ष धनंजय रामदास सापधरे, शुभम तळले, सुमित बोदडे, राहुल माळी, योगेश कपले, राजेंद्र वंजारी, राहुल सुरपाटणे, आशिष भंसाली,आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डांगे यांनी तर आभार रघुनाथ भोई यांनी मानले.







