ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे प्रतिपादन
जळगावमध्ये नवीन शोरूमच्या उद्घाटनासह मलाबार गोल्ड ॲण्ड डायमंड्सचा महाराष्ट्रात विस्तार
जळगाव (प्रतिनिधी) : जगातील आघाडीच्या आभूषण विक्रेत्यांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड ॲण्ड डायमंड्सने महाराष्ट्रातील निरंतर विस्ताराच्या नियोजनाचा एक भाग म्हणून जळगाव येथे आपल्या नवीनतम शोरूमच्या भव्य उद्घाटनाची आज गुरुवारी दि.१० रोजी घोषणा केली. तसेच, मलाबार समूहाचे अध्यक्ष एम पी अहमद यांच्या दूरचित्र माध्यमातून आभासी उपस्थितीत, महाराष्ट्र राज्य शासनाचे ग्रामीण विकास, पंचायत राज आणि पर्यटनमंत्री गिरीश दत्तात्रय महाजन यांच्या हस्ते फीत कापून या नूतन शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. विश्वसनीय ब्रँड “मलाबार” मधून दर्जेदार डिझाइन्ससह दर्जात्मक सेवा जळगावकरांना मिळेल असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

जळगावमधील मध्यवर्ती ठिकाणावर रिंगरोडवर बहिणाबाई उद्यानाजवळ असलेले हे नवीन शोरूम महाराष्ट्रातील २७ वे आणि भारतातील २८१ वे विक्री दालन आहे, जी १३ देशांमध्ये ३६० हून अधिक शोरूम्सच्या मताबारच्या वाढत्या जागतिक जाळ्यात मोलाचे योगदान देत आहेत. प्रशस्त ५,७०० चौरस फूट क्षेत्रफळावरील हे भव्य शोरूम सोने, हिरे, पोल्की, रत्ने आणि प्लॅटिनम दागिन्यांचा विस्तृत संग्रह, शिवाय माइन डायमंड ज्वेलरी, एरा अनकट डायमंड्स, डिव्हाईन हेरिटेज ज्वेलरी यासारख्या बँड्सच्या अमोध संग्रहांतील दागिने ग्राहकांपुढे प्रस्तुत करेल.
गुरुवारी दि. १० रोजी एका प्रशस्त कार्यक्रमात मलाबार समूहाचे अध्यक्ष एम पी अहमद यांच्या दूरचित्र माध्यमातून आभासी उपस्थितीत, महाराष्ट्र राज्य शासनाचे ग्रामीण विकास, पंचायत राज आणि पर्यटनमंत्री गिरीश दत्तात्रय महाजन यांच्या हस्ते फीत कापून या नूतन शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शहराचे आ. राजूमामा भोळे, खासदार स्मिताताई वाघ, मलाबार गोल्ड ॲण्ड डायमंड्स चे वेस्ट झोन मार्केटिंग मॅनेजर ऋषिकेश पवार, डेप्युटी मॅनेजर गौतम नायर, जळगाव शाखेचे प्रमुख अभिषेक भोसले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या निमित्ताने आनंद व्यक्त करताना अहमद म्हणाले, “जळगावच्या या शोरूमचे अनावरण महाराष्ट्रातील आमच्या प्रगतीच्या प्रवासातील आणखी एक मैलाचा दगड आहे. विश्वास, गुणवत्ता आणि पारदर्शकता यावर लक्ष केंद्रित करून जळगावच्या लोकांना जागतिक दर्जाच्या दागिन्यांच्या खरेदीचा अनुभव देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्ही आमच्या सर्व शोरूम्सच्या ठिकाणी केल्याप्रमाणे येथील स्थानिक समुदायाच्या जीवनाचा एक प्रेमळ भाग बनण्याचा आमचे ध्येय आहे.”
तब्बल २२,००० हून अधिक बहुभाषिक व्यावसायिकांच्या जागतिक संघाद्वारे समर्थित, मलाबारकडून १०० शहरांमधील दीड कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा दिली जाते. पारदर्शकतेसाठी या बॅण्डच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, मलाबारचा ‘वन इंडिया वन गोल्ड रेट’ उपक्रम सर्व भारतीय विक्री दालनांवर एकसमान किंमत सुनिश्चित करतो आणि प्रत्येक ग्राहकासाठी निष्पक्षता आणि मूल्याची हमी देतो. जळगावमधील नूतन शोरूम देखील मलाबारच्या नामांकित आश्वासनांची पूर्तता करेल, ज्यात पारदर्शक किंमत, आजीवन मोफत देखभाल, जुन्या सोने आणि हिन्यांच्या दागिन्यांसाठी १०० टक्के पुनखरिदीची (बायबॅक) हमी, प्रमाणित दर्जाचे हिरे, एचयूआयडी अनुरूप सोने आणि ग्राहकांच्या मनःशांतीसाठी दागिन्यांचा मोफत विमा आदींचा समावेश आहे.









