मलकापूरच्या बापलेकाने केला सोन्याच्या दागिन्यांसाठी खून
मुक्ताईनगर (प्रतिनिधी ) ;- येथील कुंड गावा जवळ महिलेची क्रूर हत्या करून तिचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून तो फेकून दिल्याची घटना २९ रोजी उघडकीस आली होती. पोलिसांनी तपास चक्रे फिरवून त्या महिलेची ओळख पटली असून मलकापूर नगरपरीषदेमधील सेवानिवृत्त कर्मचारी महिला प्रभा माधव फाळके (63, रा.गणपती नगर) असे मयत महिलेचे नाव आहे. शेजारी राहणाऱ्या बापलेकांनी सोन्याच्या दग्निंण्यासाठी या महिलेची हत्या केल्याचे तपासातून पुढे आले आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली असून विश्वास भास्कर गाढे (50) आणि भार्गव विश्वास गाढे (21, रा.गणपती नगर, मलकापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
मलकापूर नगरपरीषदेमधील सेवानिवृत्त कर्मचारी महिला प्रभा माधव फाळके यांची हत्या करून त्यांचा मृतदेह २९ रोजी कुंड गावानजीक पुर्णा नदीवरील पुलाखाली फेकून दिल्याची माहिती आरोपींची दिली आहे. पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी मलकापूर पोलीस निरीक्षकांना मयत महिलेचे फोटो पाठवून तिची ओळख पटविण्याचे आवाहन केले होते.
प्रभा फाळके यांचे गाढे परीवारासोबत कौटुंबिक संबंध होते. अगदी प्रभा फाळके या दिवसभर गाढे यांच्याच घरी राहायच्या जेवणही तिथेच करायच्या. त्यातच प्रभा फाळके यांना शेवटचा फोन भार्गव गाढे याने केला होता. त्यानुसार त्यांनी भार्गवच्या फोनची माहिती काढली तर तो घटनेच्या दिवशी मृतदेह आढळला त्या परीसरात असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे निरीक्षक शेळके यांनी मलकापूर ते घोडसगावमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात पिता-पूत्र दुचाकीवरून मृतदेह घेऊन जाताना स्पष्ट दिसून आले. परंतु एवढे असूनही मारेकरी खुनाची कबुली देत होते.
निरीक्षक शंकर शेळके यांनी भार्गव गाढेचा मोबाईलचा सीडीआर पुन्हा एकदा तपासला. त्यात त्यांना मुथुट गोल्ड फायनान्सचे काही मॅसेज दिसले. मुथुट गोल्ड फायनान्सचे ऑफिसात तपास केला असता 27, 28 तारखेला कुणी-कुणी सोनं गहाण ठेवून पैसे घेतले त्याची यादी मागितली. यादी सामोर येताच भार्गवने सोनं गहाण ठेवत एक लाख 90 हजार रुपये कर्ज घेतल्याची बाब समोर आली. सोन्याचे फोटो काढून प्रभा फाळके यांच्या मुलाले दाखवले असता, त्याने दागिने आपल्या आईचे असल्याचे ओळखले. यानंतर निरीक्षक शेळके यांनी भार्गवला ताब्यात घेतले.
पॉलिसी खाक्या दाखवताच भार्गवने खुनाची कबुली देऊन वडिलांना दारूचे व्यसन आहे. तसेच माझ्यावरही पन्नास हजाराचे कर्ज होते. तशात वडिलांनी दारूच्या नशेत २७ रोजी प्रभा फाळके यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून ठार करत अंगावरचे सोने काढून घेतले. त्यानंतर मृतदेहा प्लास्टिक पिशवीत भरून फेकून दिले.