‘मित्सुबिशी’चे सहाय्यक व्यवस्थापक संजीव कुमार यांची उपस्थिती; ग्राहकांना सवलती, उत्कृष्ट सेवा देण्याचे आश्वासन
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात प्रताप नगर परिसरात अत्याधुनिक मित्सुबिशी कंपनीच्या एसी विक्री शोरूमचे थाटामाटात उद्घाटन मंगळवार दि. १४ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. मित्सुबिशी इलेक्ट्रिक कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक संजीव कुमार यांच्या हस्ते फीत कापून तसेच दीपप्रज्वलन करीत शोरूमची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पराग इंटरप्राईजेसचे संचालक पराग चौधरी, प्रसाद जाधव, एजन्सीधारक निलेश वायकोळे, चंदनकुमार, रितेश कुमार, इमरान खान, यामिनी वायकोळे, सोनिया वायकोळे, धीरेंद्र वायकोळे, हार्दिक चौधरी, प्रियंका चौधरी, खुशी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. पराग इंटरप्राईजेसमध्ये ग्राहकांसाठी मित्सुबिशी इलेक्ट्रिक या प्रमुख कंपन्यांचे इन्व्हर्टर एसी, स्प्लिट एसी, विंडो एसी आणि कमर्शियल एसीचे विस्तृत मॉडेल उपलब्ध आहेत. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार उत्तम दर्जाचे एसी निवडता यावेत यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम मार्गदर्शन करणार आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना संजीव कुमार म्हणाले, “ग्राहकांना परवडणाऱ्या दरात उच्च-गुणवत्तेचे एसी आणि विक्री पश्चात उत्कृष्ट सेवा प्रदान करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर, आम्ही विशेष उद्घाटन ऑफर आणि सवलती जाहीर केल्या आहेत. ज्याचा लाभ घेण्यासाठी आम्ही ग्राहकांना पराग इंटरप्राईजेसला भेट देण्याचे आवाहन करतो.”
मित्सुबिशी इलेक्ट्रिक एअर कंडिशनचे डक्टेबल आणि व्ही आर एफ हे दोन्ही मोठ्या इमारती, व्यवसायिक जागा किंवा मोठ्या घरांसाठी वापरले जाणारे महत्त्वपूर्ण वातानुकूलन प्रणालीचे प्रकार आहेत. डक्टेबलचा वापर मोठ्या घरांसाठी, कार्यालयांसाठी, दुकानांसाठी आणि अशा जागांसाठी जिथे संपूर्ण जागेला एकसमान तापमान हवे असते, तिथे हे उपयुक्त आहे. तर व्ही आर एफ एअर कंडिशन, याला ‘सिटी मल्टी’ असेही म्हणतात.ही एक प्रगत तंत्रज्ञान असलेली प्रणाली आहे. ही प्रणाली मुख्यतः मोठ्या आणि मध्यम आकाराच्या व्यावसायिक इमारती, हॉटेल्स, रुग्णालये आणि अशा ठिकाणी वापरली जाते जिथे एकाच वेळी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वेगवेगळ्या तापमानाची आवश्यकता असते. तुमच्या गरजेनुसार, जागा आणि बजेटनुसार या दोनपैकी योग्य प्रणालीची निवड केली जाते.
“पराग इंटरप्राईजेस” दुकानामुळे शहरातील नागरिकांना आता एसी खरेदीसाठी दूर जावे लागणार नाही आणि त्यांना एकाच छताखाली अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.