पारोळा पोलीस स्टेशनची कामगिरी
पारोळा ( प्रतिनिधी ) :- शहरात गेल्या आठवड्यात मिठाच्या गोण्या चोरीप्रकरणी पारोळा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता दोघांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
शहरातील बाजारपेठेतील किराणा दुकानात १६ हजार ८०० रुपये किमतीच्या मिठाच्या गोण्या चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होता. पोलिसांनी संशयित राजू पंडित बच्छाव व रमेश जाधव उगरेच्छा (रा. श्रद्धा नगर, गलवाडे रोड, अमळनेर) यांना अटक केली. पारोळा न्यायालयात हजर केले असता दोघांना दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई हे.कॉ. संजय पवार, हे. कॉ. शरद पाटील, हे.कॉ. महेश पाटील, अजय बाविस्कर यांनी केली.