जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषदेचे माध्यम अधिकारी मिलिंद लोणारी यांचा नुकताच पुणे येथे आरोग्य खात्याचे सहाय्यक संचालक डॉ बाविस्कर यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला
जळगाव जिल्हा परिषेदेच्या आरोग्य विभागात कार्यरत मिलिंद लोणारी यानी कार्यालयाने त्यांच्यावर सोपवलेली जिल्हा प्रसिद्धी व माध्यम अधिकारीपदाची जबाबदारी पूर्ण करत आरोग्य खात्याच्या विविध योजनाची व्यापक प्रसिद्धी आणि प्रचार जिल्ह्यात प्रभावीपणे केला त्याचप्रमाणे कोविंड आपत्तीच्या परिस्थितीत साथरोग नियंत्रणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा राज्य आरोग्य व शिक्षण विभाग पुणे येथे सहाय्यक संचालक डॉ बाविस्कर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला,
जळगाव जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भिमाशंकर जमादार यांच्या हस्तेदेखील प्रमाणपत्र देऊन मिलिंद लोणारी यांचा गौरव करण्यात आला यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पोटोडे व .डॉ प्रमोद पांढरे , सहाय्यक प्रशासन अधिकारी दिनेश झोपे, कक्ष अधिकारी जितेंद्र सोनवणे व बागुल आणि कार्यालयातील सर्व अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.