भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील किन्ही येथे एमआयडीसीतील एका कंपनीतून चोरट्यांनी इन्व्हर्टर, शेगडी यासह सुमारे २३ हजारांचे साहित्य लांबविले. ही घटना नुकतीच घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक उत्तमचंद अग्रवाल (३९, सतलज अपार्टमेंट, गडकरी नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, किन्ही एमआयडीसीतील प्लॉट नंबर सी.११ चे कुलूप तोडून चोरट्याने १२ हजार रुपये किमतीचा इन्व्हर्टर, शेगडी, बांधकाम साहित्य, शिलाई मशीन व पत्र्याचा कुलर असा एकूण सुमारे २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुभान तडवी करीत आहेत.









