जळगाव;-तालुक्यातील म्हसावद येथील दुचाकी चोरणार्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून शक्तिसींग खेतसिंग शेखावत (वय-३२) रा. गोरीया ता. दातारामगढ जि. शिकर (राजस्थान) ह.मु. रामेदववाडी ता.जि.जळगाव असे संशयित आरोपीचे नाव आहे. शक्तीसिंह याने शांताराम बागुल (वय-४८) रा. वाकडी ता.जि.जळगाव यांची दुचाकी (एमएच १९ डीएच ७६१३) घेऊन ५ जून रोजी म्हसावद येथे कामाच्या निमित्ताने आले होते. मात्र ती कुणीतरी चोरून नेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
आरोपी शक्तीसिंह हा म्हसावद येथे असल्याच्या माहितीवरून पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, मिलिंद सोनवणे, गणेश शिरसाळे, शशिकांत पाटील, स्वप्नील पाटील, योगेश बारी यांनी कारवाई केली.