जळगाव (प्रतिनिधी ) – आडत व्यापाऱ्याकडून १२ हजारांची रोकड घेऊन एकाला देण्यासाठी जात असलेल्या दुचाकीस्वाराला दोन मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील १२ हजारांची रोकड घेऊन पलायन करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेमराज भास्कर नारखेडे वय ५० वर्ष धंदा हमाली काम करीत असून बाजार समितीमधील धुडकु सपकाळे यांचे आडत दुकानावर हमालीचे काम करतात .
२० रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास धुडकु सपकाळे यांनी खेमराज यांच्याकडे १२०००/-रु. दिले सुप्रीम कॉलनीत एका व्यक्तीला देण्यास सांगितले . आर. एल. चौफुली येथून सरळ रस्त्याने नारीयलबाबा दर्ग्याजवळुन जात असतांना रात्री ०९.४५ वा. चे सुमारास दोन मोटारसायकलस्वार येऊन मोटारसायकल आडवी लावून चाकु काढून पोटाला लावत १२ हजार काढून नेले. याप्रकरणी एमआयडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.