जळगाव (प्रतीनिधी) एमआयडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन हॉटेलांवर पोलिसांनी छापे टाकले असून अवैधरित्या कुंटणखाणा या ठिकाणी सुरु असल्याने २४ युवक युवतींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. सहाय्य्क पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने हि कारवाई केल्याने प्रेमी युगुलांमध्ये खळबळ उडाली आहे.
आज पुन्हा दोन हॉटेलवर पथकाने छापा टाकला आहे. अजिंठा रोडवरीलअसलेली हॉटेलवर पथकाने छापा टाकला. दोन्ही ठिकाणाहून पथकाने २४ पेक्षा जास्त युवक युवतींना ताब्यात घेण्यात आले असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान हॉटेल मालकही पोलीस ठाण्यात हजर झाले असून चौकशी सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले.