जळगाव (प्रतिनिधी ) ;- शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात राहणारा आणि दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीला एमआयडीसी मधील एका कंपनीतून अटक केली आहे. राहुल रामचंद्र बऱ्हाटे वय २७ असे आरोपीचे नाव असून ५ जून २०२१ रोजी त्याला पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी हद्दपारीची कारवाई केली होती. मात्र आरोपी राहुल हा एमआयडीसीमधील एका कंपनीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती . त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे ,सचिन मुंडे , इम्रान सैय्यद, किशोर पाटील,गोविंदा पाटील हेमंत कळसकर , चंद्रकांत पाटील आदींच्या पथकाने आरबी पॉलिमर्स या व्ही सेक्टरमधील कंपनीतून २६ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. सुधीर सावळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








