जळगाव ( प्रतिनिधी ) – दाम्पत्याला शिवीगाळ व मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस न्यायालयाने एक महिन्याचा सश्रम कारावास आणि १ हजार रूपयांचा दंड जळगाव जिल्हा न्यायालयाने ठोठावला आहे.
शहरात विवाहिता ही घरात एकटी असतांना आरोपी उमर शहा रोशन शहा रा.जळगाव याने महिलेच्या घरात घुसून वाईट हेतूने तिचा हात पकडून विनयभंग केला. विवाहितेने आरडाओरड केल्यानंतर विवाहितेचा पती पती धावत आला. “विवाहितेला हात का लावला ?”असा जाब विचारला असता आरोपी उमर शहा रोशन शहा याने महिलेच्या पतीला शिवीगाळ करून बेदम मारहाण केली होती.
या घटनेत नागरीकांनी आरोपी उमर शहा रोशन शहा याला रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही.व्ही. मुगळीकर यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला. शनिवार, दि. २९ जानेवारी रोजी दुपारी या खटल्याने कामकाज झाले असता विवाहिता, विवाहितेचा पती आणि तपासाधिकारी काशिनाथ कोळंबे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. न्या.मुगळीकर यांनी आरोपीला दोषी ठरवत एक महिन्याचा सश्रम कारावास आणि १ हजार रूपयांची दंड ठोठावला आहे. खटल्याकामी पैरवी अधिकारी राजेश भावसार, सहाय्यक अभियोक्ता रंजना पाटील यांनी कामकाज पाहिले.