भुसावळ तालुक्यातील सुनसगावात घडली घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सुनसगाव येथील शाळेच्या रस्त्यावर असलेल्या रोहित्राच्या खांबात (विजेची डीपी) विजप्रवाह उतरल्याने शॉक लागून एक म्हैस जागीच ठार झाली. ही घटना रविवारी दि.२४ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजता घडली. भुसावळ तालुका पोलिसांनी पंचनामा केला आहे.
संजय मुरलीधर बोदडे यांच्या मालकीची ही म्हैस जाफरी जातीची असून सुमारे १ लाख रुपये किमतीची होती. संजय बोदडे हे त्यांच्या म्हशीसह रानात चारण्यासाठी चालले असताना रोहित्र क्रमांक ६०१ जवळ वाढलेले गवत खाण्यासाठी म्हैस गेली. त्याचवेळी विज खांबाजवळील तारांचा स्पर्श होताच म्हैस जागीच कोसळली. संजय बोदडे व सुपडू कंखरे यांनी म्हशीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. सुदैवाने ते बचावले. घटनेनंतर भुसावळ तालुका पोलिसांनी पंचनामा केला असून म्हशीचे शवविच्छेदनही करण्यात आले आहे.