जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील म्हसावद येथील रेल्वे गेट ते गिरणा नदिवरील पुलापर्यंतचा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी बुधवारी २२ सप्टेंबर रोजी ग्रामस्थांतर्फे रास्ता रोको करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच देण्यात आले आहे.
गेल्या पाच वर्षापासुन हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव दुरुस्त करीत नाही. म्हसावद स्टेट बॅँक समोर रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय असुन प्रचंड चिखल झालेला आहे . जनतेच्या आरोग्यास धोकेदायक आहे. रोज येथ वाहने फसतात. या रस्त्यावरून आंध्रप्रदेश ते गुजरात रोज शेकडो अवजड वाहने जा-ये करतात. या रस्त्याच्या दोघ बाजुंना चार फुट उंचीचे रस्त्याच्या नावाने बंधारे टाकले असुन मुळ रस्त्यावरचे पाणी बाहेर निघत नाही. त्यामुळे पायी वापरनेसुध्दा अशक्य झाले आहे. तरी हा रस्ता दुरुस्त करुन मिळावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे.
हा रस्ता तातडीने पाहून त्वरित दुरुस्तीचे आदेश द्यावेत अन्यथा बुधवारी २२ रोजी होणाऱ्या रास्तारोकोच्या परिणामास, वाहतुकीस निर्माण झालेल्या अडअथळयास आपण व संबंधित अधिकारी जबाबदार रहाल, असा इशारा यापूर्वी देण्यात आला आहे.