जळगाव तालुक्यातील
म्हसावद येथील घटना, ५ जणांना अटक
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील म्हसावद येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेट्स ठेऊन दोन समाजात तेढ निर्माण होईल कृत्य केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस कॉन्स्टेबल राकेश जयराम बच्छाव यांनी सोमवारी पहाटे फिर्याद दिली आहे. ते म्हसावद पोलीस चौकि येथे कार्यरत आहे. मागील १५ दिवसांपासुन म्हसावद येथील पटेल वाडा येथील मंदीराच्या जीर्णोद्धारावरून दोन समाजात वाद सुरु होता. दोन्ही समाजातील वाद मिटविण्यासाठी पोलीस शांतता समितीच्या दोन ते तिन वेळेस बैठका घेवून दोन्ही समाजास शांतता पाळण्याचे आवाहन करत आहे. काही दिवसांपूर्वी अशोक बळीराम भिल रा. म्हसावद याने बाहेरील राज्याचे जुने वादग्रस्त स्टेटस ठेवले होते. त्यावरून त्याला तौफिक शाह मेहमूद शाह, कासीम रज्जाक मनीयार यांनी आरीफ रज्जाक मनीयार याचेकडे नेले. त्यांनी अशोक भिल याला माफी मागण्यास सांगून अशपाक गुलाम रसुल शाह याने त्याचे मोबाईलवर चित्रीकरण करीत विडिओ एडिट केला व ते व्हायरल केले.
त्यानंतर रविवारी दि. ११ जून रोजी गावातील दोन्ही समाजातील मुलांनी गावातील, जिल्हयातील, राज्यातील सामाजिक धार्मीक तेढ वाढवुन दंगल घडवुन आणण्याच्या उद्देशाने कट रचुन इंन्स्टाग्राम, व्हॉटसअप अशा सोशल मिडीयाचा मोबाईलव्दारे वापर केला. त्यात वादग्रस्त पोस्ट एक-दुस-यांच्या मोबाईल वर प्रसारीत केली. म्हणुन अशोक बळीराम भिल, जयवीर राजपुत, माजीत बाबुलाल पटेल, अबुजार पटेल, आरीफ रज्जाक मनियार, तोफिक शाह मेहमूद शाह, कासिम रज्जाक मनियार, अशपाक गुलाम रसुल शाह, इम्रान सुभान पटेल यांच्यासह दोन अल्पवयीन व ईतर समाजकंटकाविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.
संशयितांपैकी दोन अल्पवयीन असून अशोक भिल, अबुजार पटेल, आरिफ रज्जाक, अशपाक शाह फरार आहेत. तर जयवीर राजपूत, मजीद पटेल, तौफिक शाह, कासीम मणियार, इम्रान पटेल यांना अटक करण्यात आली आहे.