म्हसावद , ता. जळगाव ( प्रतिनिधी ) – म्हसावदजवळ आज सकाळी रेल्वेमार्गावरील पोल नं ३९४\११/१२ अपलाईन जवळ दहिगाव सतं (ता पाचोरा ) येथील रहिवासी सागर गणेश खडसे (वय २२ वर्षे ) याने स्वत धावत्या रेल्वेसमोर झोकुन देत आत्महत्या केली.

सागरचे वडील वडिल.गणेश महादेव खडसे रिक्षा चालक आहेत आणि आई.कल्पनाबाई गणेश खडसे गृहिणी आहेत गावात एका समुदायात वाद झाला होता त्यावेळी काही लोकांनी लोहारा व कळमसरातील नातेवाईकांना बोलाऊन सागरला मारहाण केल्याने पाचोरा पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
रेल्वे आरपीएफ पोलिस प्रमोद सांगळे.(म्हसावद) , पो.ना. स्वप्नील पाटील , पो काॅ हेमंत पाटील हे पुढील तपास करीत आहे.







