

जळगाव (प्रतिनिधी) : थेपडे विद्यालय, म्हसावद येथे इयत्ता दहावी (२००५-०६ बॅच) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शुक्रवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी विद्यालयाच्या प्रांगणात अत्यंत आनंदी आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.
या प्रसंगी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक वाय. आर. जाधव, माजी पर्यवेक्षक पि. के. मुथा,आर. एच. पाटील, एस. एम. पिंगळे, व्ही. आर. पाटील, एस. डी. हुजरे, एस. बी. साळवे तसेच नूतन ज्ञानमंदिर, अडावदचे उपमुख्याध्यापक एस. के. भंगाळे, थेपडे विद्यालय, म्हसावदचे उपमुख्याध्यापक जी. डी. बच्छाव सर,ए. आर. काळे, नानाभाऊ चौधरी आणि तुषार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या बालपणीच्या शालेय आठवणींना उजाळा दिला. शाळेत झालेल्या सकारात्मक परिवर्तनांची आणि विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. संस्थेचे, शाळेचे आणि सर्व गुरुजनांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून जीवनातील शाळेचे, गुरुजनांचे आणि मित्रांचे महत्त्व सांगत भावनिक वातावरण निर्माण केले. विविध क्षेत्रांत कार्यरत असताना मिळालेल्या अनुभवांचे कथन त्यांनी उपस्थितांसमोर मांडले.
या वेळी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा संकल्प सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकमुखाने केला.मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.









