जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील म्हसावद गावात एका तरुणाच्या बंद घरातून चोरट्याने ५६ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेक किशोर चव्हाण (वय ३४, रा. म्हसावद) यांच्या घरात ही चोरी झाली. विवेक चव्हाण हे कुटुंबीयांसोबत म्हसावद येथे राहतात. दिनांक १९ ते २० ऑगस्टच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना, चोरट्याने संधी साधून कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर विवेक चव्हाण यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी विवेक चव्हाण यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे करत आहेत.