जळगाव ( प्रतिनिधी ) ;- तालुक्यातील म्हसावद आणि बोरनारे दरम्यान असलेल्या शिवारात दोन भावांवर वीज कोसळल्याने दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली .
कुणाल माधवराव पाटील वय 29 व चेतन माधवराव पाटील वय 27 दोघे सख्खे भाऊ व आई रेखाबाई माधवराव पाटील रा. म्हसावद ता.जि.जळगाव हे तिघे जळगाव तालुक्यातील म्हसावद व बोरनार दरम्यान शिवारात काल दुपारी 2:30 ते 3 दरम्यान शेतात कापूस लागवड करीत असताना. दुपारी पाऊस व वीजाचा कडकडाट होत असतांना वरिल दोघे भाऊ शेतात निबांच्या झाडाखाली आश्रय घेण्यासाठी गेले असता. या वेळी दोघे सक्के भाऊंच्या अंगावर विज पडली यात कुणाल हा 30 टक्के जवळपास भाजला गेला आहे. तर दुसरा चेतन हा 10 फुट दुर फेकला गेला. दोघे ही बेशुद्ध अवस्थेत होते. यावेळी आई रेखाबाई हीने हा प्रकार बघितला त्यांनी लागलीच आरडाओरडा करत जवळ असलेले शेतकरी बोलवून जळगाव येथे खाजगी हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी दाखल केलंय आहे. यात कुणालची तब्येत गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. काल संध्याकाळी हॉस्पिटला तहसीलदार नामदेव पाटील व म्हसावद तलाठी नेरकर यांनी भेट घेऊन विचार पुस केली होती. दोघे भाऊ अविवाहित आहे .याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलिसांनी पंचनामा केला आहे.
परिवारातील वडील नाही आई आहे. दोघे भाऊ आहे