जळगाव (प्रतिनिधी) – प्रभाग समिती क्रमांक 1 ते 4 च्या सभापती यांची निवड गुरुवारी ८ रोजी झाली.प्रभाग समिती अंतर्गत कामांचा आढावा घेणे, नागरीकांच्या संपर्कात राहून समस्या जाणून घेवुन त्या संबंधीत विभागा मार्फत सोडविणे. या कामांसाठी प्रभाग समिती सभापती यांना वाहन व दालन पुरवावे अशी मागणी पत्राद्वारे महापौर भारती सोनवणे यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना केली आहे.
नवनिर्वाचित प्रभाग समिती क्र. 1 ते 4 च्या चारही सभापती यांना त्याचे प्रभाग समिती कार्यालयात दालन उपलब्ध करुन देणे तसेच महानगरपालिकेतर्फे वाहन उपलब्ध करुन देणे बाबत संबंधीतांना आदेश व्हावेत, असेही पत्रात म्हटले आहे.







