जळगाव (प्रतिनिधी ) शहरातील एल.के. फाउंडेशनतर्फे विजयादशमी (दसरा ) निमित्त बुधवारी ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५१ फूट उंच रावणाच्या प्रतिकृतीचे दहन मेहरूण तलाव चौपाटीवर करण्यात येणार असून यावेळी फटाक्यांची आतषबाजी केली जाणार आहे. अशी माहिती माजी महापौर ललित कोल्हे यांनी बोलताना दिली .
रावण दहन कार्यक्रम ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, माजी महापौर ललित कोल्हे, गटनेते सुनिल महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.