डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश
जळगाव ( प्रतिनिधी ) – मुक्ताईनगर तालुयातील दीड वर्षीय चिमुकलीला मेंदूज्वर या गंभीर आजारावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार करून तिचे प्राण वाचवण्यात डॉटरांना यश आले आहे. अचानक आलेल्या झटयांमुळे आणि शरीराची हालचाल कमी झाल्यामुळे कुटुंबीयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वेळेवर मिळालेल्या तज्ज्ञ वैद्यकीय सेवेमुळे चिमुकली आता पूर्णपणे सुधारून घरी परतली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुयातील या दीड वर्षीय मनस्वी पाटील ह्या चिमुकलीला अचानक तीव्र तापासोबत झटके येऊ लागले. झटयांनंतर तिच्या शरीराची हालचाल मंदावली, प्रतिसाद कमी झाला तसेच बेशुद्धावस्थेसारखी स्थिती निर्माण झाली. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने तिला जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल होताच बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उमाकांत अणेकर, डॉ. सुयोग तन्नीरवार यांच्यासह तज्ज्ञांच्या टीमने तातडीने तपासणी सुरू केली. चिमुकलीच्या प्रकृतीची तीव्रता लक्षात घेऊन पाठीतील पाण्याची तपासणी करण्यात आली. यासोबतच सीटी स्कॅन आणि एमआरआय तपासणी करून मेंदूतील स्थितीची सखोल पाहणी करण्यात आली. सर्व तपासण्यांच्या आधारे चिमुकलीला मेंदूज्वर असल्याचे निदान झाले.निदान होताच तिला तातडीने बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. येथे तज्ज्ञ डॉटर, अनुभवी नर्सिंग स्टाफ आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांच्या मदतीने २४ तास निरीक्षणाखाली उपचार सुरू करण्यात आले. झटके थांबवण्यासाठी आवश्यक औषधोपचार, मेंदूतील सूज कमी करण्यासाठी उपचार, ताप नियंत्रण, द्रवपदार्थ आणि पोषण व्यवस्थापन अशा सर्वांगीण उपचारांची योजना राबवण्यात आली.सततच्या तज्ज्ञ निरीक्षणामुळे आणि वेळेवर योग्य औषधोपचारामुळे अवघ्या आठवडाभरात चिमुकलीचे झटके नियंत्रणात आले. हळूहळू तिच्या शरीराची हालचाल सुधारू लागली, शुद्धीवर येण्याची प्रक्रिया वेगाने झाली आणि प्रतिसादही पूर्ववत होऊ लागला. डॉटरांच्या पथकाने केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे तिच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली.औषधोपचार पूर्ण झाल्यानंतर आणि सर्व तपासण्या समाधानकारक आल्यानंतर चिमुकलीला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. कुटुंबीयांनी डॉटरांचे व रुग्णालयातील संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानले. औषधोपचारासाठी डॉ. कुशल धांडे, डॉ. ओमश्री गुडे, डॉ. अभिजीत अरमाळ, डॉ. निरज जगताप, भारती झोपे, हिरामण लांडगे यांच्यासह नर्सिंग स्टाफने परिश्रम घेतले.


मेंदूज्वर हा लहान मुलांसाठी अतिशय गंभीर आजार असून वेळेवर उपचार न मिळाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. या चिमुकलीला योग्य वेळी रुग्णालयात आणल्यामुळे तातडीने तपासण्या करून अचूक निदान करता आले. बालरोग अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ उपचारांमुळे झटके नियंत्रणात आले आणि मुलीची प्रकृती सुधारली. पालकांनी मुलांमध्ये अचानक ताप, झटके, शुद्धी कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता तातडीने तज्ज्ञ रुग्णालयात दाखल करावे.
-डॉ. अभिजीत अरमाळ,
निवासी
डॉ. उल्हास पाटील रूग्णालय, जळगाव.








