जळगाव (प्रतिनिधी ) शहरातील मेहरूण तलावजवळ असणाऱ्या ट्रॅकनजीक एका कडुनिंबाच्या झाडाला दोराने गळफास घेतलेल्या अवस्थेत एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आज ३ शनिवार रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आढळून आल्याची घटना घडली असून मृत व्यक्तीचा शालक आणि पत्नीने घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला असल्याने हि आत्महत्या आहे कि हत्या याचा पोलीस शोध घेत आहे.
गणेश रामदास अहिरे वय ४० रा. तांबापुरा जळगाव असे मयत व्यक्तीचे नाव आहे . याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, गणेश अहिरे हे ड्रायव्हर असून आज दुपारी दोन अडीच वाजेच्या सुमारास घरी जेवण्यासाठी आले होते. मात्र त्यांनी जेवणापूर्वी पैसे घेऊन मग जेवण करतो असे सांगून निघून गेले होते. . यानंतर शालक प्रवीण चंद्रकांत वाघ यांना सोशल मीडियावर गणेश अहिरे यांचा मृतदेह असलेला फोटो पाहण्यात आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह वैद्यकीय महाविद्यालय येथे आणला. सीएमओ डॉ. अहिरे यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान मयत गणेश अहिरे यांच्या पश्चात पत्नी, आई आणि मुलगा असा परिवार आहे. गणेश अहिरे यांच्या खिशात वसुलीचे १ ते सव्वा लाख रुपये असल्याचे मयताचे शालक प्रवीण चंद्रकांत वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले असून त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. यावेळी रिपाइंचे युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तापास करीत आहे.