जळगाव (प्रतिनिधी ) ;- शहरातील मेहरूण तलाव येथे एका ६० वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना आज १ रोजी दुपारी २ वाजेपूर्वी उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.लोटन पितांबर चौधरी रा. आयोध्यानगर असे मृत व्यक्तीचे नाव असून तलावातून त्यांचा मृतदेह काढण्यात येऊन जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास संजय भोई आणि असीम तडवी करीत आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते. दरम्यान आत्महत्या घरगुती वादातून झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.